लातूर : रेणा सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून (व्हीएसआय) राज्यस्तरीय आर्थिक व्यवस्थापन आणि सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता यासाठी प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुण्यात माजी केंद्रीय कृषीमंत्री, खा. शरद पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांनी पुरस्कार व प्रशस्तीपत्र स्वीकारले. रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, माजी आमदार अॅड, त्र्यंबक भिसे, ‘रेणा’चे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, यशवंतराव पाटील, उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे आदी उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर येथे उजाड माळरानावर रेणा साखर कारखान्याची उभारणी झाली. माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री, आमदार अमित देशमुख व रेणा साखर कारखान्याचे संचालक तथा आमदार धिरज देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याची दैदीप्यमान वाटचाल सुरू आहे.
कारखान्याने आतापर्यंत देश व राज्य पातळी १३ पुरस्कार प्राप्त केले आहेत. पुणे येथील पुरस्कार सोहळ्यास कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संग्राम माटेकर, प्रेमनाथ आकनगिरे, चंद्रकांत सूर्यवंशी, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, तानाजी कांबळे, अनिल कुटवाड, संजय हरिदास, प्रवीण पाटील, लालासाहेब चव्हाण, अनिल कुटवाड, स्नेहल देशमुख, सतीश पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.