लातूर : रेणा कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४- २०२५ साठी मिल रोलचे सोमवारी (दि.५) पूजन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातुर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते हा पूजनाचा कार्यक्रम झाला. आगामी गळीत हंगामासाठी तयारी सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रोलर पूजन समारंभाला रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, माजी आमदार त्र्यंबक भिसे, राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे व्हा. चेअरमन प्रमोद जाधव, ट्वेन्टीवनचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, श्री संत मारुती महाराज कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, रेणाचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे, मांजराचे कार्यकारी संचालक पंडित देसाई, विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, संत शिरोमणीचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे, जागृती शुगरचे प्रकल्प व्यवस्थापक गणेश येवले, मांजरा शुगर इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे, प्रेमनाथ आकणगिरे, प्रवीण पाटील आदी उपस्थिती होती.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.