लातूर : मांजरा कारखान्याकडून प्रती टन २७०० रुपयांची उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

लातूर : सध्या मांजरा कारखान्याचा गळीत हंगाम गतीने सुरु आहे. कारखान्याने १७ डिसेंबरअखेर १ लाख १४ हजार ४० मे. टन उसाचे गाळप केलेले असून त्यापासून ८७ हजार ४५० मे. टन साखर उत्पादन केले आहे. कारखान्याने ४७ लाख ४९ हजार ६३५ केडब्ल्यूएच विजेची निर्यात महावितरण कंपनीस केली असून ११ लाख ५९ हजार ४३३ लिटर इथेनॉलचे उत्पादन केले आहे. चालू गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रती मेट्रिक टन २७०० रुपयांप्रमाणे बिले जमा केली आहे.

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक, माजी मंत्री व कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी शेतकरी हिताचा विचार करून जाहीर केल्याप्रमाणे ऊस बिले अदा करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. या परिवारातील मुख्य आधारस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने आपल्या वाटचालीत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे कार्य सातत्याने सुरु ठेवले. यातून शेतकरी समृध्द झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर यांदरम्यान गळीतास आलेल्या ऊसाची बिले १७ डिसेंबर रोजी संबधीत ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत. शेतकऱ्यांनी बँक शाखेतून ऊस बिलाची रक्कम उचल करावी असे आवाहन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केले आहे.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here