लातूर : औसा तालुक्यातील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक अडीच ते तीन लाख टन उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे ऊस घेऊन जाण्यासाठी जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपली वाहने तालुक्यात आणली आहेत. ऊस नेण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. तालुक्यात ऊस तोडीला वेग आला असून सध्या जिल्ह्याबाहेरील आंबेडकर, भाऊसाहेब बिराजदार, कंचेश्वर (मांजरा दोन) व अन्य काही कारखान्याकडून उसाची तोड सुरु आहे. मांजरा परिवारातील इतर कारखान्यांनी औसाकडे मोर्चा वळविला आहे.
सद्यस्थितीत बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याकडून प्रतिदिन २४०० मेट्रिक टन ऊस वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तोडणी, वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा संचालक मंडळाचा संकल्प आहे. मागील वर्षीपेक्षा शेतकऱ्यांना अधिक दर मिळेल, यासाठी चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील, कार्यकारी संचालक व मंडळ प्रयत्नशील आहे. अद्याप किल्लारी साखर कारखाना सुरु झाला नाही. उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे सर्व साखर कारखाने आता गेटकेनवर भर देत असले, तरी अद्याप कुठल्याही साखर कारखान्याने आपला भाव जाहीर न केल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.