लातूर : लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना, विलास साखर कारखान्याच्या २०२५-२०३० या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालक मंडळाच्या निवडणुका दिलीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाल्या. राज्यातील सहकार क्षेत्रात सलग २५ वर्षे बिनविरोध निवडून येणारे मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने राज्यात पहिले आहे
मांजरा साखर परिवाराचे मांजरा, रेणा, विलास, विलास २, मारुती, जागृती, ट्वेंटी वन त्याचप्रमाणे परभणी नांदेड, धाराशिव जिल्ह्यात तीन साखर उद्योग आहेत. लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनेलचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या उमेदवारांमध्ये माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार अमित देशमुख, मदन भिसे, नवनाथ काळे, अशोक काळे, वसंत उफाडे, कैलास पाटील, धनराज दाताळ, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, कदम भैरू, श्रीशैल्य उटगे, सदाशिव कदम, नीलकंठ बचाटे सचिन शिंदे दयानंद बिडवे, निर्मला चामले, छाया कापरे, शंकर बोळंगे, अनिल दरकसे, बाळासाहेब पांढरे यांचा समावेश आहे