लातूर : मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकरी, खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. तत्पूर्वी कारखान्याचे संचालक नवनाथ दादाराव काळे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली.
कारखान्याच्या गाळप हंगाम २०२४-२५ साठीची सर्व कामे झाली असून कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज आहे, अशी माहिती कारखान्याच्या वतीने जाहीर करण्यात आली. लातूर विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ गुरुवारी झाला. यावेळी उपस्थित संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी.
यावेळी मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, संचालक अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, सदाशिव कदम, वसंत उफाडे, नीळकंठ बचाटे पवार, महेंद्रनाथ भादेकर, शेरखान पठाण, सूर्यकांत पाटील, अनिल दरकसे, कैलास पाटील, ज्ञानेश्वर भिसे, सचिन शिंदे, धनराज दाताळ, बंकट कदम, विलासराव चामले, कार्यकारी संचालक पंडित देसाई, श्रीनिवास देशमुख यांच्यासह खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.