लातूर : येथील विलास सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी दाखल २३ अर्जांपैकी २ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरले. त्यामुळे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील विलासराव देशमुख सहकार पॅनलचे सर्व २१ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले. दोन एप्रिल रोजी याची औपचारिक घोषणा होईल. गेल्या २५ वर्षांपासून अमित देशमुख यांनी कारखान्यावील आपले वर्चस्व अबाधित राखले आहे.
आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलासराव देशमुख सहकार पॅनेलच्या २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये अमित देशमुख, विद्यमान अध्यक्ष वैशाली विलासराव देशमुख, लता देशमुख, रवींद्र काळे, नरसिंग बुलबुले, रसूल पटेल, तात्यासाहेब पालकर, रंजित पाटील, गोवर्धन मोरे, वैजनाथ शिंदे, अनंत बारबोले, हणमंत पवार, नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, अमृत जाधव, सतीश शिंदे, दीपक बनसोडे, शाम बरुरे, सुभाष माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर या पॅनलच्या विरोधात संभाजी वायाळ व स्वयंम वायाळ या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पण छाननीत या दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कारखाना गेल्या २५ वर्षांपासून हा कारखाना वाटचाल करीत आहे. या कारखान्याने २४ गळीत हंगामात ३६ पेक्षा अधिक राज्य आणि देशपातळीवरील पुरस्कार मिळवले आहेत.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.