दोहा : लेबनानचे पंतप्रधान नजीब मिकाती यांनी दोहा येथे झालेल्या एका बैठकीत अल्जिरियाकडून साखर निर्यात करण्यावर लागू केलेल्या निर्बंधातून सूट देण्याची मागणी केली आहे. दोन आठवड्यापूर्वी युक्रेन युद्धाच्या परिणामांमुळे वाढत्या अन्नधान्य संकटामुळे अल्जेरियाने अन्नधान्य निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत.
कृषी आणि व्यापार मंत्र्यांच्या संयुक्त प्रस्तावावर अल्जेरियाकडून साखर, पास्ता, तेल, गव्हाशी निगडीत सर्व वस्तूंची निर्यात रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे. इतर सर्व देशांनी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आपला अन्नधान्य साठा सुरक्षित ठेवण्यासाठी अल्जेरियाने हा निर्णय लागू केला. त्यामुळे अनेक मुख्य वस्तूंच्या किमतीमध्ये जागतिक वाढ झाली आहे.
जगातील अनेक देशांनी रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान, साखर निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. देशांतर्गत अन्नधान्याच्या साठ्यावर परिणाम होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे.