अहमदनगर : पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांसाठी कायदेविषयक शिबिर झाले. तालुका विधी सेवा समिती व वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश जी.एम. साधले, न्यायाधीश एच.जे. पठाण यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अशोक रोडे होते.
कार्यक्रमाला कुकडी कारखान्याच्या संचालिका डॉ. प्रणोती जगताप प्रमुख उपस्थित होत्या. न्यायाधीश पठाण यांनी कामगारांच्या कायद्याची व विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी सर्व ऊसतोड कामगारांना त्यांच्या लहाण मुलांना अंगणवाडीत व शाळेत घालण्याचे आवाहन केले. बालकांना सकस आहार व शिक्षण मिळाल्यामुळे त्यांची प्रगती होईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनिल यशवंत महिंद व वकील संघाचे जेष्ठ विधिज्ञ ॲड. झेड. टी. गायकवाड, ॲड. गणपतराव इंगळे, ॲड. बापुसाहेब भोस, सरकारी वकील नागवडे, ॲड. रमेश जठार, डी. बी. झराड, संदीप कावरे, विधिज्ञ ॲड. सुनिता पलीवाल, स्वाती आचार्य, ज्योती बळे, स्वयंसेवक चांदणी खेतमाळीस आदी उपस्थित होते.