नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने महाराष्ट्रा मध्ये विधान परिषदे च्या रिक्त जागांवर विशिष्ट दिशा-निर्देशां सह निवडणूक लढवण्यास मंजूरी दिली आहे. आयोगाने शुक्रवारी ट्वीटर वर ही माहिती दिली. या निवडणुका 21 मे ला होतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या विशेष आग्रहावरुन आयोगाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर निवडणूकीवर घातलेल्या बंदीमध्ये विशेष परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
आयोगाने ट्वीट करुन सांगितले की, महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणूका होतील. या जागा 24 एप्रिल ला रिक्त झाल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्य विधानमंडळाचा सदस्य बनण्याची संविधानिक अनिवार्यता पाहून आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंचा विधान परिषद निवडणूूकांच्या माध्यमातून आमदार होण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. संविधानानुसार त्यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या सहा महिन्याच्या आत विधान मंडळाचा सदस्य बनण्याचा अनिवार्य असणारा कालावधी या महिन्याच्या शेवटी संपेल.
कोरोना मुळे विधान सभेच्या कोणत्याही जागेवर उप निवडणुका होणे शक्य नसल्यामुळे ठाकरे यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषद जागेवर त्यांना निवडण्याचा आग्रह कोश्यारी यांनी केला होता. राज्य विधान परिषदेमध्ये राज्यपाल कोट्यातून दोन जागा सुरक्षित आहेत. राज्यपालांनी ठाकरे यांना निवडण्या ऐवजी आयोगाकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी विशेष आग्रह केला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.