रुडकी, उत्तराखंड: सणासुदीच्या दिवसांमध्ये लिब्बरहेडी साखर कारखान्याकडून शेतकर्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. शेतकर्यांकडून 10 एप्रिलपर्यंत पुरवठा करण्यात आलेल्या ऊसाची थकबाकी लवकरच त्यांना मिळणार आहे.
साखर कारखान्यांकडून अत्यंत कमी गतीने थकबाकी भागवली जात आहे. गाळप हंगाम 2019-20 चे साखर कारखान्याकडून 145 करोड रुपये देय आहे. थकबाकी भागवण्याच्या मागणीबाबत शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांच्याकडून साखर कारखान्यांना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. लिब्बरहेडी साखर कारखान्याचे ऊस महाव्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून 15 करोड ची थकबाकी भागवली आहे. शेतकर्यांना हे पैसे पुढच्या आठवड्यापर्यंत मिळतील. तसेच, कारखाना व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जात आहेत की, उर्वरीत थकबाकीही लवकर भागवली जावी. सहायक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, लक्सर साखर कारखान्याकडूनही काही पैसे मिळण्याची आशा आहे. तर इकबालपूर साखर कारखानाही काही पैसे भागवेल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.