पुणे : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री.बी.टी.पावसे यांना दि शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली या संस्थेकडून साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल LIFE TIME ACHIEVEMENT AWARD 2024 ने सन्मानित करण्यात आले. साखर आणि संबंधित उद्योगांच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल पावसे यांचा सन्मान करण्यात आला.
30 जुलै 2004 रोजी जयपूर प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (जयपूर, राजस्थान) येथे STAI च्या 82 व्या वार्षिक परिषदेच्या उद्घाटन समारंभात पावसे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी STAI चे अध्यक्ष संजय अवस्थी यांच्यासह साखर उद्योगातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते.