लॉकडाउनमध्ये ऊस शेतकर्‍यांचे संकट जास्त खोल

तामिळनाडू: कोरोना मुळे ऊस शेतकर्‍यांवरही याचा वाईट पद्धतीने परिणाम होत आहे. लॉकडाउनमुळे सहकारी साखर कारखान्यांना ऊस बिल देण्यात झालेला उशिर, ऊस तोडणीसाठी मजुरांची कमी आणि बँकांकडून बिया खरेदीसाठी कर्ज घेण्यात येणार्‍या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांचे म्हणणे आहे की, ऊसाला चांगली मागणी असूनही या संकटाने त्यांना पुढच्या हंगामासाठी पीक घेण्याच्या संबंधांत निराश केले आहे.

साखर कारखानेही आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे ऊस थकबाकी भागवण्यात ते अपयशी होत आहेत. याशिवाय, ऊसाच्या तोडणीसाठी मजुर मिळत नाहीत. यामुळे ऊस शेतकर्‍यांसाठी हे संकट अधिक खोल झाले आहे.

मदुरै च्या वलानदूर चे एक शेतकरी करुपैया यांनी सांगितले की, मी दोन एकरमध्ये पीक घेतले होते आणि पीक तोडणीसाठी ऊस तोडणी कामगार मिळणे कठीण झाले होते. मजुरांच्या वाढत्या मागणीमुळे, त्यांची मजुरी जवळपास दुप्पट झाली आहे आणि प्रत्येक टन ऊसाच्या तोडणीसाठी ते 1,200 रुपये मागत आहेत. संकटाला सांभाळणे अवघड होत आहे.

कृषी चे संयुक्त निदेशक टी विवेकानंदन यांनी सोंगितले की, लॉकडाउन दरम्यान मजुर, शेतकरी आणि अधिकार्‍यांच्या वाहतुकीसाठी पास देण्यात येत आहेत, जेणेकरुन आवश्यक गोष्टींमध्ये अडचणी येणार नाहीत. लॉकडाउन अवधीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेमध्ये कमी कष्टाच्या मुद्याला एका मर्यादेपर्यंत संबोधित करण्यात आले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here