नवी दिल्ली: देशामध्ये आता लॉकडाउन इफेक्ट कमी होताना दिसत आहे, देश पुन्हा एकदा ट्रॅकवर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार गेल्या वर्षाच्या यास अवधीच्या तुलनेत भारतामध्ये ऑक्टोबर च्या पूर्वीच्या पंधरवड्यात जवळपास 9 टक्के अधिक डीजेलचा वापर झाला आहे, आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत पेट्रोल ची विक्री 1.5 टक्क्याची वाढ दिसून आली आहे.
देशव्यापी लॉकडाउन नंतर ही पहिली संधी आहे, जेव्हा डीजेलच्या वापरामध्ये वाढ झाल्याने आर्थिक हालचाली वाढल्याचा संकेत मानला जात आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोल च्या विक्री ने पूर्व महामारीच्या स्तराला स्पर्श केला आहे, कारण लोक हळू हळू खाजगी वाहनांचा वापर करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.