रुड़की: टोळांच्या हल्ल्याचा धोका पाहून ऊस विभागाने अलर्ट जारी केला आहे. सर्व ऊस पर्यवेक्षकांनी गावात जाऊन शेतकऱ्यांना जागरुक करावे, असे सांगण्यात आले आहे.
देशात अनेक राज्यात टोळांच्या हल्ल्यानंतर उत्तराखंड मध्येही टोळ येण्याची शंका आहे. हे पाहून ऊस विभागाने अलर्ट जारी केला आहे. ऊस आयुक्त ललित मोहन रयाल यांनी सांगितले की, यावेळी ऊस शेतात पिकला आहे. शेतकरी दिवस रात्र ऊसाचे पीक पिकवण्याच्या तयारीत मग्न आहे. अशा वेळी टोळचे दल लाखोंच्या संख्येने एका जागेवऊन दुसऱ्या जागेत जातात. अशा परिस्थितीत ऊस पर्यवेक्षकांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी शेतकऱ्यांना जागरूक करुन टोळ आक्रमणापासून पीक वाचवण्याच्या उपायांची माहिती द्यावी.
टोळांपासून वाचण्याचे उपाय :
– टोळ धाडीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी डबे वाजवून मोठा आवाज करावा.
-शेतात धूर करुन पाणी भरावे, जेणेकरुन ते शेतावर बसू शकणार नाहीत
– शेतकऱ्यांनी सातत्याने शेत आणि झाडांवर लक्ष ठेवावे
– फेनुवल डस्ट, मैलाथियान 10 किलो प्रति एकर वर फवारावे. ही फवारणी सकाळीच करावी
– क्लोरोपॉयरीफांस 50 टक्के ईसी सह 200 लीटर चे मिश्रण बनवून फवारावे, ही फवारणी रात्री 11 ते सकाळी आठ दरम्यान उपयुक्त आहे.
कृषी तज्ञांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जोराचा आवाज आणि किटकनाशकांची फवारणी करावी. कृषि विज्ञान केंद्र धनौरी चे प्रभारी डॉ. पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले की, राजस्थानकडून येणाऱ्या टोळ आक्रमणाची स्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी जागरुक राहावे. शेतकऱ्यांनी पिकावर क्लोरो पाइरीफास ची फवारणी करावी. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. टोळ पिकांचे मोठे नुकसान करतात, यासाठी अलर्ट राहणे आवश्यक आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.