मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दहशत माजविल्यानंतर टोळ दल राजधानी दिल्लीकडे चालला आहे. इथे लाखांच्या संख्येत टोळ येण्याचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे अनेक राज्यात अलर्ट जारी केला आहे. उन्हाळी या हवामानात टोळ दलाचे आक्रमण अधिक वेगाने झाले आहे. ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कृषी मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, औरेय्या, इटावा, एटा, फरुखाबाद, आगरा, फिरोजाबाद, मथुरा, बुलंदशहरापर्यंत टोळ दल पोचत आहेत. याशिवाय राजस्थान, हरियाणा येथील मेवात मधून येवून टोळ दल राजधानी दिल्लीच्या वाटेवर आहेत. टोळांच्या संभावित आक्रमणासाठी प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. आपल्या पीकांना टोळांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी शेतकर्यांना उपाय सांगितले जात आहेत, तसेच कृषी वैज्ञानिक सल्लाही देत आहेत.
शेतकर्यांना सांगितलेले उपाय :
* कृषी विभागाच्या अधिकार्यांनी सागितले की, टोळ दलाच्या नियंत्रणासाठी शेतकरी दोन प्रकारचे साधन वापरु शकतात.
* शेतकर्यांनी टोळ्या करुन मोठा आवाज करुन, ध्वनियंत्र वाजवून, टोळ दलाला घाबरवून पळवून लावू शकतात.
* यासाठी ढोलक, ट्रॅक्टर, मोटर सायकल चा सायलेंसर, रिकामे डबे, थाळी इत्यादी पासून आवाज निर्माण केला जावू शकतो.
* पिक आणि वृक्षांना टोळाच्या प्रकोपासून वाचवण्यासाठी शेतकर्यांना कीटनकाशक मालथियन, फेनवालरेट, क्विनालफोस, क्लोरोपायरीफोस, डेल्टामेथ्रिन, डिफ्लूबेनजुरान, फिप्रोनिल तसेच लामडासाइहलोथ्रिन कीटकनाशकाचा प्रयोग करण्याची सूचना दिली.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानुसार, यावेळी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मद्य प्रदेशामध्ये टोळ दलांचा प्रकोप आहे. सर्वात वाईट प्रकारे राजस्थान प्रभावित आहे. मंत्रालयातील एका अधिकार्याने सांगितले की, टोळ दलांचा प्रकोप पूर्वेकडे वाढू लागला आहे. ज्यामुळे खाद्य सुरक्षेसाठी धोका वाढू शकतो. टोळांची जगभरात 10 हजार पेक्षा अधिक प्रजाती आहेत. पण भारतात मुख्यपणे चार प्रजाती आहे. वाळवंटी टोळ, प्रव्राजक टोळ, बम्बई टोळ आणि पेड वाला टोळ हे सक्रिय आहेत. ज्यावेळी हिरव्या मैदानावर सर्व वाळवंटी टोळ एकत्र येतात तेव्हा त्यांचे झुंड भयानक रुप घेतात. यामुळे त्यांना जगातील सर्वात धोकादायक कीटक संबोधले जाते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.