पीलीभीत : तराई च्या पूरनक्षेत्रामध्ये टोळांचा हल्ला झाला आहे. यामुळे अन्नदाता एकदम संकटात आला आहे. आता याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात नाही, पण मोठ्या संख्येने टोळ पीके खात आहेत. तसेच शेतांमध्ये हजारोंच्या संख्येमध्ये अंडी घालत आहेत. एका जागरुक शेतकर्याची नजर ज्यावेळी टोळांवर पडली तेव्हा त्याने कृषी अधिकार्यांना सूचना दिली. यावर अधिकार्यांनी नियोजित स्थळी जावून शेताची तपासणी केली.
या सखल क्षेत्रातील जनपद पीलीभीत च्या पूरनपूर तहसील शेतीच्या नावाने ओळखले जाते. इथे तांदुळ गहूशिवाय ऊसाचेही मोठे उत्पादन होते. प्रत्येक वर्षी कुठला ना कुठला रोग आणि कीड पतंगांचा प्रकोप पीकांवर येतो. पण गेल्या काही वर्षांपासून देशातील काही भागात टोळ दलाच्या हल्ल्याने शेतकर्यांना अडचणीत टाकले आहे. यामुळे भारत सरकारशिवाय उत्तर प्रदेश सरकारनेही अलर्ट जारी करुन कृषी अधिकार्यांना याच्याशी निपटण्यासाठी सांगितले आहे.
शेतकर्यांना जागरुक राहण्यास सांगितले आहे. पुरनपूर क्षेत्रामध्ये जागरुक शेतकरी सातात्याने यावर नजर ठेऊन आहेत. क्षेत्राचे प्रमुख शेतकरी गुरुमंग सिंह यांनी आपल्या सिमरिया आणि लालपूर च्या शेतांवर टोळ पाहिले तेव्हा त्यांची झोपच उडाली. त्यांच्या शेतामध्ये हजरोंच्या संख्येने टोळांची पिल्ले दिसून आली. यावर त्यांनी लगेचच त्या पिल्लांना जमीनीत गाडून टाकले. तसेच त्यांना ऊसाच्या पीकावर पाने खात असलेले दिसले. यावर त्यांनी नमुना म्हणून काही टोळांना आपल्या जवळ ठेवले.
याची सूचना शेतकर्यांनि तात्काळ कृषी अधिकार्यांना दिली. याावर उप कृषी निदेशक यशराज सिंह आणि जिल्हा कृषी रक्षा अधिकारी बुधवारी पूरनपूर पोचले. त्यांनी शेतावर जावून टोळांची तपासणी केली. त्यांनी हे मान्य केले की, हे टोळ वेगळे आहेत, जे या क्षेत्रात यापूर्वी कधीही दिसले नव्हते.
अचानक या क्षेत्रामध्ये टोळ दिसू लागल्या पासून शेतकर्यांची झोप उडाली आहे. एका जागरुक शेतकर्याने टोळ पाहिले आणि अधिक़ार्यांना अलर्ट केले. याप्रकारे क्षेत्रातील अन्य शेतकर्यांनाही जागरुक राहण्याची गरज आहे. जेणेंकरुन वेळेत शेतकरी पीकांचे नुकसान होण्यापासून शेत वाचवू शकतील.
उप कृषी निदेशक यशराज सिंह म्हणाले, एका शेतकर्याच्या सुचनेवर मी शेतात जावून तपासणी केली. हे टोळ वेगळ्या प्रकारचे आहे. शेतकर्याने सक्रियता दाखवून रिकाम्या शेतात त्यांच्या पिल्लांना गाडून टाकले. ज्यामुळे त्यांची संख्या वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. क्षेत्रातील अन्य सर्व शेतकर्यांनीही जागरुक होऊन पीकांचे निरिक्षण करावे. टोळ दिसल्यावर लगेचच औषध फवारणी करावी.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.