सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला शासकीय प्रतिनिधींनी अचानक भेट देऊन वजनकाट्याची पाहणी केली. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे केलेल्या वजनावेळी, प्रत्येकवेळी अचूक वजन नोंदविण्यात आल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या वजनकाटा हा अचूक असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या समितीकडून देण्यात आले.
तपासणीवेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक सुहास देसाई, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, यांच्यासह देसाई कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.