सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारवाढ गळीत हंगामापूर्वी पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनी दिली. यंदा कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवल्याचेही देसाई यांनी सांगितले. दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते.
देसाई म्हणाले, कारखान्याने २०२२-२३ च्या गळीत हंगामामध्ये २ लाख १६ हजार १९८२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी १२.०७ टक्के साखर उताऱ्याने २ लाख ६१ हजार ७९० विवंटल साखर उत्पादन केले आहे. हा कारखाना सभासदांच्या हक्काचा असून, तो चालविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून गळीत हंगाम यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अशोकराव पाटील, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, शशिकांत निकम, बबनराव शिंदे, सुनील पानस्कर, शंकरराव पाटील, विजय सरगडे, दीपाली पाटील, जयश्री कवर, कार्यकारी संचालक एस. एल. देसाई, अधिकारी, कर्मचारी उपस्थित