बीड: लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ गळीत हंगामात ७,३०,७७२.९९० मे. टन ऊस गाळप केलेले आहे. या ऊसासाठी प्रती टन २,५५१ रुपये यापूर्वीच अदा करण्यात आले आहे. परंतु कारखान्याचे मार्गदर्शक आ. प्रकाश सोळंके यांनी अतिरिक्त भाव देण्याचे जाहीर केलेले होते. त्यानुसार प्रती टन १०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादकांचे खाती जमा करण्यात आलेली आहे. कारखान्याचे चेअरमन विरेंद्र प्रकाशराव सोळंके यांनी ही माहिती दिली.
कारखान्याने दि. २३ ऑगस्ट रोजी ऊस बिलाची देय प्रती टन १०० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम वर्ग केली आहे. गळीत हंगामातील ११ मार्चपर्यंत गाळप केलेल्या ऊसासाठी २७०० रुपये प्रती टननुसार पेमेंट ऊस उत्पादकांना यापूर्वीच अदा करण्यात आलेले आहे. मात्र १२ मार्च ते २३ मार्च या १२ दिवसाचे पेमेंट अदा करणे बाकी होते. आता या १२ दिवसांचे ४४,६३७ मे. टन गाळप उसाकरीता २७०० रुपयांचा पहिला हप्ता २१ ऑगस्ट रोजी कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. तोडणी वहातुक बिलासह कमिशनची रक्कमही ठेकेदारांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. याबाबत अडचण आल्यास फिल्ड स्टाफशी संपर्क साधण्याचे आवाहन चेअरमन सोळंके यांनी केले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.