शेतकऱ्यांच्या जादा ऊस दर देणाऱ्या साखर कारखान्याकडे नजरा

अहमदनगर : ऊस उत्पादनात घट होणार असल्यामुळे यंदा साखर कारखान्यांसमोर हंगाम चालविण्याचे आव्हान आहे. उसाच्या कमतरतेमुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चांगला दर देणाऱ्या कारखान्याला ऊस पाठविण्याचा विचार करत आहेत. उसाला जादा दर दिल्याशिवाय कोंडी फुटणार नाही असे म्हटले जात आहे. यंदा पाऊस नसल्याने ऑक्टोबरमध्येच ऊस चाऱ्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे गाळप क्षमता वाढवूनही ऊस आणायचा कुठून, असा प्रश्न आहे.

गेल्यावर्षी परतीच्या पावसाने साखर कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. अतिरिक्त पावसामुळे उत्पादन वाढीला फटका बसला. यंदा एफआरपीपेक्षा जादा भाव कोण देतो, याची चर्चा सुरू आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे कोल्हे हे नेतृत्व जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देऊन सर्व शेतकऱ्यांमध्ये चर्चा घडवितात. यंदाचा ऊस हंगाम अवघा २ ते ३ महिने चालेल. हंगामी कामगारांना पुढचे ८ ते ९ महिने हाताला कामच मिळणार नाही. आता आगामी, २०२४ हे निवडणुकांचे वर्ष असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात जादा दर पडेल, अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here