लाल सड रोगामुळे अडीचशे हेक्टर ऊस पिकाचे नुकसान

महराजगंज : सिसवा क्षेत्रात ऊसाच्या शेतामध्ये अधिक पाणी असल्याने आणि दुष्काळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सिसवा भागातील जवळपास पाचशेहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाल सड रोगाचा फैलाव ऊसावर झाला आहे. अशा स्थितीत ऊसाची मुळे नष्ट झाली असून ऊस वाळला आहे. आगामी गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील सिसवा, ठुठीबारी, घुघली, निचलौल, गड़ौरा विभागातील ४० शेतकऱ्यांनी १५,९१० हेक्टरमध्ये ऊस शेती केली आहे. मात्र, पीक तयार होण्यापूर्वी शेतात अधिक पाणी आणि दुष्काळामुळे निम्म्याहून अधिक गावांतील शेतकरी चिंतेत आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सिसवा भागातील खेसिहारी, सिसवा बुजुर्ग, बरवा द्वारिका, मधवलिया, प्रतापपुर, चैनपूर, बैजनाथपूर आदी गावातील पाचशे शेतकऱ्यांच्या सुमारे २५० हेर्टरमधील उसावर लाल सड रोगाचा फैलाव झाला आहे. ऊसाच्या शेतांमध्ये अधिक पाणी साठल्याने इतर रोगांचाही फैवाल झाला आहे. परिणामी आता पिक वाळू लागले आहे. सिसवा कारखान्याचे सरव्यवस्थापक कर्मवीर सिंह यांनी सांगितले की, सिसवा विभागात ८७१७ हेक्टरमध्ये ऊस शेती आहे. यातील अडीचशे हेक्टरमध्ये लाल सड रोग आहे. शेतकऱ्यांनी शेतांमध्ये ठिकठिकाणी खड्डे काढून ब्लिचिंग पावडर टाकून माती झाकून घ्यावी. त्यातून इतर रोगांना आळा बसू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here