हरारे : ऑक्सफोर्ड बिझनेस ग्रुपने (ओबीजी) तयार केलेल्या एका अहवालानुसार दक्षिण आफ्रिका महाद्वीपावर ऊस उत्पादन आणि गळीताच्या दृष्टीने उद्योग विकसित करण्याची अपार संधी आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्रात मुलभूत सुविधा, पाणी, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांसोबत उत्पादन विस्ताराचीही खूप क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे कार्यकारी संचालक जोस ओरिव यांनी या अहवालात म्हटले आहे की, साखर उत्पादनाच्या क्षेत्रात दक्षिण आफ्रिका क्षेत्र खूप प्रगत आहे. मात्र, अनेक आव्हानामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.
आफ्रिकेतील सर्वात मोठ्या साखर उत्पादकांमध्ये ईस्वातिनी, दक्षिण आफ्रिका आणि झिंबाम्ब्वेचा समावेश आहे. ऑक्सफर्ड बिझनेस ग्रुपच्या जागतिक संशोधन आणि विश्लेषण फर्मद्वारे मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील आर्थिक घडामोडींवर प्रकाशझोत टाकला जातो. या फर्मने शुगर इन आफ्रिका फोकस रिपोर्टमध्ये आपले निष्कर्ष मांडले आहेत. अहवालात म्हटले आहे की, आफ्रिकेतील निम्मे देश ऊसाचे उत्पादन करतात. यामध्ये दक्षिण आफ्रिका, ईजिप्त, इस्वातिनी, मोरक्को, युगांडा, सुदान, केनिया यांचाही समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेतील कच्च्या साखरेचे उत्पादन २०२०-२१ या हंगाात २.१ मिलिटन टनावरुन वाढून २०२१-२२ या हंगामात २.२ मिलिटन टन होण्याची शक्यता आहे. ईस्वातिनीमध्ये हे उत्पादन ७,००,००० टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारखान्यांची क्षमता वृद्धी आणि उच्च गुणवत्तेच्या पिकांच्या उत्पादनांमुळे यापूर्वी हे उत्पादन ६,९०,००० टन होते. २०२१-२२ मध्ये झिंबाम्ब्वेमधील उत्पादन ४,१५,००० टनाहून अधिक होईल. यापूर्वी हे उत्पादन ४,०८,५१८ टन होते.
ओबीजीच्या अहवालानुसार, झिम्बाब्वेने २०१९-२० या हंगामात ९८,६०८ टन कच्ची साखर आणि १६,३०३ टन रिफाईंड साखर निर्यात केली. त्या आधीच्या हंगामात अनुक्रमे ६२,८१५ टन कच्ची साखर आणि १०,०९४ टन रिफाईंड साखर निर्यात करण्यात आली होती. आफ्रिकेतील साखर क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता आहे असे ओरिवने अहवालात म्हटले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link