येणार्या 2021 या नव्या वर्षात प्रत्येक आठवड्यात एलपीजी सिलेंडर चे दर निश्चित होवू शकतात. आता गैस सिलेंडर चे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित होत होते. डिसेंबर मध्ये दोनवेळा एलपीजी सिलेंडर च्या रेटमध्ये वाढ झाली आहे. हे पाहता एलपीजी वितरकांनी सांगितले की, आता प्रत्येक आठवड्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल होईल.
पेट्रोलियम पदार्थांच्या दरांमध्ये रोज होणार्या चढ उतारांना पाहता विपणन कंपन्यांनी आता साप्ताहिक आधारावर किमतींमध्ये बदल करण्याची योजना आखली आहे. कंपन्यांनी सांगितलें की, यामुळे कंपनी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होईल. त्यांच्यानुसार, कंपन्यांकडून याचा प्रस्ताव केंद्रीय पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाकडे पाठवला आहे. यावर चर्चा सुरु आहे.
पेट्रोल डिजेलचे दर रोज 6 वाजता निश्चित केले जातात. यामुळे तेलाच्या दरांमध्ये कोणताही बदल झाल्यास पेट्रोलियम कंपन्या त्याला सहजपणे रोज समायोजित करुन घेतात, पण स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती निश्चित झाल्याने त्यांना पूर्ण महिन्यापर्यंत नुकसान सोसावे लागते.
यामुळे कंपन्या बर्याच काळापासून किंमतीमध्ये बदल करण्याच्या पद्धतींवर विचार करत होत्या. हा प्लॅन कंपन्यांना होत असणारे नुकसान कमी करण्यासाठी बनवला गेला आहे. या नव्या व्यवस्थेच्या माध्यमातून कंपन्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.