नांदेड : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी व्हीपीके उद्योग समूह कार्यरत आहे. यंदा ही सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उसाचे कांडेही शिल्लक ठेवणार नाही, अशी ग्वाही एम. व्ही. के. व डॉ. शंकरराव चव्हाण कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे यांनी दिली.
वाघलवाडा येथील दोन कारखान्यांचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळ्यात ते बोलत होते. व्ही. पी. के. उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव पाटील-कवळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळ्यास प. पू. यदुबन महाराज मठ संस्थान कोलंबी, प. पु. रामभारती महाराज मोहनपुरा, प. पू. आनंदपुरी गुरुदत्त पुरी महाराज दत्त संस्थान चोळाखा, शास्त्री बुवा बिजेगावकर यांच्या हस्ते झाला.
चेअरमन कवळे गुरुजी म्हणाले, मागच्या काळात भागातील साखर कारखाना बंद पडल्याने उसाची लागवड होत नव्हती. आता व्हीपीके, एमव्हीके, डॉ. शंकरराव चव्हाण असे तीन कारखाने सुरू आहेत. उमरी परिसर सिंचनमय झाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावी आणि आपला विकास साधावा. सिंचन सुविधा वाढल्याने शेतकऱ्यांचे हीत साधले गेले आहे, असे चेअरमन कवळे गुरुजींनी सांगितले.
यावेळी एस. पी. पुयड व बाबूराव भोसले यांनी सूत्रसंचलन केले. जनसंपर्क अधिकारी यू. जी. कदम यांनी आभार मानले. यावेळी कारखान्याचे चेअरमन आर. डी. कवळे, पतसंस्थेचे चेअरमन गजानन पांपटवार, पांडुरंग देशमुख, प्रविण पाटील चोळाखेकर, शंकरराव पाटील, गणपतराव पाटील नांदेकर, सतीश पाटील, चक्रधर गुंडेवार, दिगांबरराव गायकवाड, प्रशांत पाटील ढोणे, गणपतराव पाटील हस्सेकर, पांडुरंग पाटील वाघलवाडेकर, साई कृपा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्टचे सीईओ परमेश्वर पाटील, गणेशराव पाटील, किशनराव पाटील आदी उपस्थित होते.