Marayur गुळाला मिळतोय जादा दर

इडुक्की : जिल्ह्यातील पारंपरिक उत्पादन असलेल्या मरायुर गुळाला विक्रमी दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक किलो मरायुर गुळाचा दर १२० रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन कमी झाल्याने दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. ओणम सणाच्या काळात दर आणखी वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले.

मरयूरमध्ये मेसा गूळ उत्पादन युनिट चालविणाऱ्या अकबर अली यांनी सांगितले की, गुळ उत्पादनावर अतिवृष्टीमुळे परिणाम झाला आहे. गेल्यावर्षी जूनमध्ये या भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान झाले. उसाचा सरासरी वाढीचा कालावधी १२ महिन्यांचा असतो. मात्र, अतिवृष्टीमुळे ऊस तोडणीस उशीर झाला. उत्पादन घटल्याने दरवाढ झाली आहे.

द हिंदूमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मरायुरमधील गुळ विक्रेते जी. राजन म्हणाले की, ब्रँडेड मरायूर गुळाची किरकोळ विक्री किंमत ९० रुपयांवरून १२० रुपयांवर पोहोचली आहे.

मरयुरजवळील नचिवायल गावातील शेतकरी मणिकंदन म्हणाले की, उसाचा उत्पादन खर्च जास्त आहे. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीपासून दूर जात आहेत. उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे.

केरळ कृषी विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आणि बौद्धिक संपदा अधिकार विभागाचे माजी समन्वयक सी. आर. एल्सी यांनी सांगितले की, गूळ बनवण्याच्या प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करण्यात आणि भौगोलिक संकेतांकासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली होती. मार्च २०१९ मध्ये या गुळाला केंद्र सरकारकडून जीआय टॅग मिळाला. केवळ मरयूरमध्ये उत्पादित होणारे पारंपरिक उत्पादन शुद्धतेने प्रमाणित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here