रोहतक: महम साखऱ कारखान्यामध्ये सेंद्रीय गुळ साखर बनवली जाईल. ज्यामध्ये कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला जाणार नाही आणि जे सामान्य माणासापर्यंत सहजतेने पोचू शकेल. याबाबत प्रदेशचे सहकार मंत्री डॉक्टर बनवारी लाल यांनी सांगितले. ते शनिवारी दी हरियाणा सहकारी साखर कारखाना भाली आनंदपूरच्या 65 व्या गाळप हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
सहकार मंत्र्यांनी सांगितले की, प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये चांगले काम केले जात आहे. रोहतक साखर कारखान्यामध्ये रिफाइंड साखर तयार केली जात आहे. तर पाच किला, एक किलो आणि पाच ग्रॅम च्या छोट्या पॅकेटमध्ये साखरेची पॅकिंग केली जात आहे.
सहकार मंत्र्यांनी सांगितले की, सरकारने सहकारी कारखान्यांमध्ये गुळ आणि साखरेचे उत्पादन करण्याचाही निर्णय घेतला आहे. गुळ आणि साखर पूर्णपणे सेंद्रीय असतील. पहिल्या टप्प्यात पलवल, महम आणि कैथल च्या कारखान्यांमध्ये साखरेबरोबर सेंद्रीय गुळ आणि साखरेच्याही उत्पादनाचा आरंभ होईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.