महाराष्ट्र : शेतकऱ्यांना उसाच्या एफआरपीचे २३ हजार कोटी रुपये अदा

पुणे : राज्यात २९ फेब्रुवारीअखेर कारखान्यांनी एकूण ८२४ कोटी ८० लाख टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. ९२ साखर कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी शेतकऱ्यांना दिली आहे. मात्र, अद्यापही ११४ कारखान्यांनी पूर्णपणे रक्कम दिलेली नाही. सद्यस्थितीत फेब्रुवारीअखेर ऊसतोडणी वाहतूक खर्चासह एफआरपी २५ हजार ५०६ कोटी रुपये आहे. त्यापैकी २३ हजार ४४१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. एकूण देय रकमेच्या ९६.६८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे.

राज्यातील ६४ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के एफआरपीची रक्कम दिलेली आहे. तर ३१ कारखाने असे आहेत की ज्यांनी ६० ते ७९ टक्के रक्कम दिली आहे. आणि १९ कारखान्यानी शेतकऱ्यांना शून्य ते ५९ टक्के रक्कम दिली नाही. दरम्यान, थकीत एफआरपीवर साखर आयुक्तालयात नुकतीच सहा साखर कारखान्यांची सुनावणी झाली. त्यामध्ये सोलापूरमधील दोन खासगी, अहमदनगरमधील दोन सहकारी, हिंगोलीतील एक सहकारी आणि धाराशीवमधील एक मिळून सहा साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यांना त्वरित रक्कम देण्याच्या सूचना साखर आयुक्त अनिल कवडे यांनी दिल्या आहेत. अन्यथा, जप्तीच्या कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here