कोल्हापूर, दि. 26 जून 2018
केंद्र सरकारने साखरेचे प्रति क्विंटलचे किमान विक्री दर 2900 रुपये केले आहेत. या विक्री दरामध्ये 200 रुपयांची वाढ करून किमान विक्री दर ३ हजार १०० रुपये महाराष्ट्रत आणि ३ हजार ३०० उत्तर प्रदेश साठी करावा अशी मागणी साखर कारखान्यांकडून होत आहे. काल दिल्लीत सहकारी साखर कारखाना राष्ट्रीय महा इंडियन शुगर मिल यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
किमान विक्री दर ठरवताना तो प्रत्येक राज्याचा वेगळा असावा अशीही सूचना यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रात प्रतिक्विंटल 3100 रुपये तर उत्तर प्रदेशमधील 3300 रुपये किमान दर करावा. असा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अशा निर्णयामुळे देशातील साखर कारखान्यांना उभारी येणार आहे. हा निर्णय केंद्र सरकारने तत्काळ घ्यावा आणि साखर उद्योगाला चालना द्यावी अशीही मागणी समोर आली आहे.
सध्या सध्या प्रति क्विंटल साखर विक्री दर 2900 आहे त्यामुळे तर उद्योगाला बऱ्यापैकी चालना मिळत आहे. हाच दर राज्यनिहाय वेगळा झाला तर आणखी चित्र वेगळे असू शकते. किमान विक्री दर वाढल्याचा फायदा केवळ कारखान्यांनाच होणार नाही तर तो देशातील शेतकऱ्यांनाही होणार आहे.