महाराष्ट्र : राज्यातील आणखी ५० हजार शेतकऱ्यांना ‘एआय’ प्रकल्पात सहभागी होण्याची संधी

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीसाठी बारामती येथील ‘अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’ हे गेल्या वर्षभरापासून ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाइब्ज’ प्रकल्प राबवत आहे. पहिल्या १००० शेतकऱ्यांकडे चांगले निष्कर्ष मिळाले असून, पुढील टप्प्यात राज्यात सुमारे ५० हजार शेतकऱ्यांपर्यंत प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे.  यामुळे राज्यातील साखर उद्योगात क्रांती होणार असून ऊस उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

सत्या नाडेला, एलोन मस्क यांनी घेतली प्रकल्पाची दखल…

मायक्रोसॉफ्टचे चेअरमन सत्या नाडेला यांनी अलीकडेच बारामती येथील ऊस प्रकल्पाचा संदर्भ देत सोशल प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वी ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) शेतीवरील परिणाम अधोरेखित केला आहे. याला उत्तर देताना, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी टिप्पणी केली होती की, ‘एआय सर्वकाही चांगले करेल.’ बारामतीमधील शेतकरी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेतीत उल्लेखनीय यश मिळवत आहेत. शेतीच्या भविष्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. अलिकडेच भारत भेटीदरम्यान, सत्या नाडेला यांनी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि होत असलेल्या नाविन्यपूर्ण कामाची प्रशंसा केली.

भारत क्षेत्रफळामध्ये आघाडीवर, हेक्टरी उत्पादकतेमध्ये पिछाडीवर…

‘ऍग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे कि, लागवडीखालील क्षेत्रफळामध्ये भारत सर्वांत मोठा देश असला तरी हेक्टरी उत्पादकतेमध्ये ब्राझील, चिली यांच्या तुलनेत मागे आहे. भारतातही तामिळनाडू राज्यापेक्षाही महाराष्ट्र ऊस उत्पादकतेत पिछाडीवर आहे. त्यामागे जमिनीची कमी सुपीकता, अयोग्य व्यवस्थापन पद्धती, गुणवत्तापूर्ण देण्याची कमतरता, खत पाण्याचा असंतुलित वापर, वातावरण बदल, कीड व रोगांचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, अयोग्य वेळी तोडणीमध्ये घटणारे वजन अशी अनेक कारणे दिसतात. या समस्यांवर मात करण्याच्या उद्देशाने ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमता (एआय) तंत्राचा वापर करण्यासंदर्भात बारामती येथील ‘अधिकल्चरल डेलपमेंट ट्रस्ट’ चे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी पुढाकार घेतला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संचालक डॉ. अजित जावकर व मायक्रोसॉफ्टचे संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांच्या मदतीने त्यासाठी ‘सेंटर फॉर एक्सलन्स फार्म व्हाय प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याहारे गेल्या वर्षभरापासून १००० शेतकऱ्यांकडे राबविलेल्या पथदर्शी प्रकल्पात अत्याधुनिक सेन्सर्स, तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमतेद्वारे उस पिकाला खत, पाणी व कीड रोग नियंश्यासाठी फवारणी कधी आणि कितो प्रमाणात द्यायचे, याची माहिती मोबाइलवर पुरवली जाते.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र (एआय)  कसे फायदेशीर ?

ऊस लागवडीपूर्वी केलेले माती परीक्षण आणि उपग्रहाद्वारे मिळवलेला परीक्षण अहवाल यांचे एकत्रित विश्लेषणातून पायाभूत खत मात्रा (बेसल डोस) निश्चिती केली जाते.  Al तंत्राने वाढवलेली २१ दिवसांची सशक्त व मुळांचा जारवा अधिक असलेली रोपे उपलब्ध केली जातात. लागवडपूर्व ते तोडणीपर्यंत सातत्याने मातीतील ओलावा व पोषक घटकांची माहिती रोज (VPD) मोबाइलवर आल्याने सिंचन व खत व्यवस्थापन अचूक करता येते. दीड महिन्यापासून फुटव्यांची संख्या, कांडोची लांबी, संख्या, जाडी आणि उसाची उंची यात दुपटीने वाढ होते. त्यातील योग्य वेळी तोडणीमुळे उत्पादन वाढीसोबतच साखरेचे प्रमाणही अधिक मिळेल. शेतक-यांसोबतय कारखान्यांनाही  फायदा होईल.

उत्पादन खर्चात होते मोठी बचत…

पारंपरिक ऊस उत्पादनात रासायनिक खतांवर एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च होतो. ‘एआय’ प्रक्षेत्रामध्ये अचूक व काटेकोर नियोजनामुळे १८ ते १९ हजारांत खत व्यवस्थापन होते. (शेणखत खर्च धरलेला नाही.) मजुरी खर्च कृत्रिम बुद्धिमता न वापरलेल्या ऊस शेतीत एकरी ७० मजूर व ५०० रुपये मजुराप्रमाणे ३५ हजार रुपये खर्च होती. कुत्रिम बुद्धिमत्ता वापरलेल्या शेतात ४० मजूर आणि २३,२०० रुपये खर्च येतो. म्हणजे मजूर खर्चात १२ हजार रुपयांची बचत होते.

शेतकऱ्यांची निवड व मिळणाऱ्या सेवा…

दुसऱ्या टप्यात महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील २ हजार क्लस्टरची निवड करण्यात येणार आहे. प्रत्येक क्लस्टरमधून किमान २५ प्रगतिशील शेतकऱ्यांची व २५ ते ५० एकर क्षेत्राची निवड करण्यात येईल. या निवडलेल्या नोंदणीकृत शेतात AI-आधारित लागवड चाचण्यांचे आयोजन केले जाईल. सॅटेलाइट मंपिंगच्या आधारे माती आणि जमिनीचे विश्लेषण करणे ग्राउंड थ्रडिंग द्वारे बेसल डोस ठरविणे प्रत्येक क्लस्टरमध्ये २५ शेतकऱ्यांत एक या प्रमाणे क्षेत्रात ऑटोमेटिक वेदर स्टेशन बसविणे. उपग्रहाद्वारे आणि IOT माती परीक्षण सेन्सर वापरून डेटा संकलन करणे. सर्व शेतकऱ्यांच्या शेतात सॉइल मॉइश्चर सेन्सर (मातीचा ओलावा) बसविणे. मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड यांच्या मदतीने एका पीक कालावधीसाठी सर्वकष पीक नियोजन आणि व्यवस्थापन विषयक शिफारशी देणे.  या प्रकल्पात भाग घेण्यासाठी शेतकऱ्याने दोन एकरांसाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी  अधिक माहितीसाठी, तुषार जाधव – ९३०९२४५६४६. यांच्याशी संपर्क करावा, असे लेखात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

पुणे – श्री संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक : पाच अर्ज बाद, १९५ अर्ज वैध

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here