महाराष्ट्र : राज्यात 2 डिसेंबरअखेर 76.86 लाख टन उसाचे गाळप, कोल्हापूर विभागाचा राज्यात सर्वाधिक उतारा

पुणे : राज्यात ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असून साखर आयुक्तालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 2 डिसेंबरअखेर 76.86 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 57.47 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.48 टक्के आहे. 17.34 लाख टन ऊस गाळप करून पुणे विभागाने 13.57 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. पुणे विभागाचा 7.83 इतका आहे. विभागात 13 सहकारी आणि 8 खासगी असे 21 कारखाने सुरु आहेत. दुसरीकडे कोल्हापूर विभागात 19 सहकारी आणि 10 खाजगी असे एकूण 29 कारखाने सुरु आहेत. त्यांनी आतपर्यंत 15.94 लाख टन उसाचे गाळप करून 13.61 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सध्या कोल्हापूर विभागाचा राज्यात सर्वाधिक 8.54 टक्के उतारा आहे.

सोलापूर विभाग ऊस गाळपात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात 7 सहकारी आणि 14 खाजगी असे एकूण 21 कारखाने सुरु आहेत. आतापर्यंत विभागात 14.25 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून 9.57 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा उतारा 6.72 टक्के इतका आहे. अहमदनगर (अहिल्यानगर) विभाग ऊस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. या विभागात 12 सहकारी आणि 8 खाजगी असे एकूण 20 कारखाने सुरु झाले आहेत. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 10.88 लाख टन उसाचे गाळप करून 7.45 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सोलापूर विभागाच्या तुलनेत अहमदनगर विभागाचा साखर उतारा 6.85 टक्के म्हणजे किंचितसा जास्त आहे.

नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर विभाग अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. नांदेड विभागात 8 सहकारी आणि 17 खाजगी असे एकूण 25 कारखाने सुरु असून त्यांनी 10.27 लाख टन उसाचे गाळप करून 7.7 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 7.5 टक्के इतका आहे. तर छत्रपती संभाजीनगर विभागात 7 सहकारी आणि 7 खाजगी अशा एकूण 14 साखर कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. त्यांनी 7.22 लाख टन उसाचे गाळप करून 4.87 लाख साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर उतारा 6.75 टक्के इतका आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here