मुंबई : महाराष्ट्राने २०२०-२१ या गळीत हंगामात साखर निर्यातीत देशाचे नेतृत्व केले आहे. देशाच्या एकूण साखर निर्यातीत हा हिस्सा ५० टक्क्यांचा आहे.
प्रसार माध्यमांतील वृ्त्तानुसरा, आतापर्यंत ४३ लाख टन साखर निर्यातीच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली ाहे. त्यापैकी सुमारे २० लाख टन साखर महाराष्ट्रातून निर्यात होणार आहे. राज्यात आतापर्यंत ९७९.५१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यासाठई ९३९.२८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. सद्यस्थितीत गाळप हंगामात सहभागी झालेल्या १८७ साखर कारखान्यांपैकी ६१ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.
केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, यंदा ६० लाख टन साखर निर्यतीचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत ४३ लाख टन साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी २१.४० लाख टन साखर कारखान्यांतून पाठविण्यात आली आहे. तर १६.३० लाख टन साखर निर्यातीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दरम्यान, वाहतूक भाड्यामध्ये कंटेनरची उपलब्धता आणि भाडेवाढीची समस्या भेडसावत आहे. मात्र, सरकारने निर्यात अनुदान जाहीर केल्याने साखर कारखाने निर्यातीस प्राधान्य देत असल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.