महाराष्ट्र : उसापाठोपाठ आता खरिप हंगामात सर्वच पिकांसाठी ‘एआय’चा वापर करण्याची तयारी

मुंबई : सध्या राज्यात ऊस शेतीत प्रायोगिक प्रणाली राबविली जाणार असून, तत्त्वावर ‘एआय’चा वापर केला जातो. त्यामध्ये बीजप्रक्रिया, कृषी त्याचे फायदेही समोर आले आहेत. त्यामुळे खरीप हंगामापासून राज्यात सर्वच पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या ‘विस्तार’ या संकेतस्थळाचा वापर यासाठी करण्यात येणार आहे. कृषी सहायकासाठी खरीप हंगामापासून ‘एआय’चा वापर ही माहिती सहायभूत ठरेल असे कृषी करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागाचे प्रधान सचिव विकासचंद रस्तोगी यांनी दिली.

खरीप पिकांमध्ये एआयचा वापर असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशात पहिलेच राज्य ठरणार आहे. राज्यातील कृषी गणणेनुसार अत्यल्प शेतकरी खातेदारांची संख्या ९३ लाख ४३ हजार तर अल्प भूधारक शेतकरी खातेदारांची संख्या ५१ लाख १७ हजार आहे. निम्न मध्यम आणि मोठ्या शेतकरी खातेदारांच्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांसाठी योजना किंवा अन्य बाबी राबविणे कठीण आहे. त्यामुळे ‘विस्तार’च्या माध्यमातून राबविले जाणारे एआय तंत्रज्ञान फायदेशीर ठरू शकते. नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या) वापरासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे विस्तार हे संकेतस्थळ पीकस्थिती आदी विषयांसह कृषी क्षेत्रासंबंधी बाजारपेठ, बाजार समित्यांमधील सल्ला आणि आनुषंगिक सेवा देते. या माहितीचा वापर कृषी विभागही राज्यात करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here