मुंबई :महाराष्ट्र विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला.यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्त जाती, जमाती यांच्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे.याशिवाय, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलामुंलीसाठी ८२ शासकीय वसतीगृह स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी सन २०२४ -२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी ३८ ते ६० हजारांपर्यंत निवास भत्ता दिला जाईल.अनुसूचित जाती-जमातीसांठी अनुसूचित जाती उपाययोजनेच्या अंतर्गत शाळा, आश्रमशाळा, विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.इतर मागासवर्गीय विमुक्त जाती, भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अंतर्गत दरवर्षी ३८ हजार ते ६० हजारांपर्यंत निवास भत्ता देण्यात येणार आहे.