पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी, २३ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रिय कृषीमंत्री शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि संस्थेचे उपाध्यक्ष व विश्वस्त दिलीप वळसे-पाटील तसेच संस्थेचे विश्वस्त व नियामक मंडळ सदस्य उपस्थित राहणार आहेत.
ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार, संस्थेतील शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच कारखान्यातील सर्वोत्कृष्ट काम करणारे अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये विभागवार ऊस भूषण पुरस्कार, कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कै. वसंतराव नाईक पुरस्कार, कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार व के. वसंतदादा पाटील पुरस्कार या नावाने साखर कारखान्यांना उत्कृष्ट कामगिरी, नाविन्यपुर्ण कामगिरी, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन, तसेच सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक, चिफ इंजिनिअर, चिफ केमिस्ट, मुख्य शेतकी अधिकारी, फायनान्स मॅनेजर, आसवनी व्यवस्थापक, पर्यावरण अधिकारी व ‘व्हीएसआय’मधील शास्त्रज्ञ यांना हे पुरस्कार दिले जातात.
या सभेमध्ये सभासद कारखान्यांना व विभागवार जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ऊस भुषण, राज्यस्तरीय ऊस भूषण, साखर कारखान्यातील व संस्थेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैयक्तीक, साखर कारखान्यांना विभागवार तांत्रिक कार्यक्षमता, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट आसवनी, सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन, नाविन्यपूर्ण व तांत्रिक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट कारखाना, सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार दिले जातात.
विभागवार ऊस भूषण पुरस्कार –
सन २०२३-२०२४ च्या गाळप हंगामामध्ये विभागवार ऊस भूषण पुरस्कारासाठी कारखान्याकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून दक्षिण, मध्य, उत्तर,पूर्व विभागामध्ये हंगामवार जास्तीत जास्त उसाचे उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे (नऊ) पुरस्कार दिले जातात.
राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार –
सन २०२३-२०२४ च्या गाळप हंगामामध्ये राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार साखर कारखान्याकडून आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून दक्षिण, मध्य, उत्तर, पूर्व विभागामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या तीन शेतकऱ्यांना रोख १०,०००/- रूपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाते.
वैयक्तिक पुरस्कार –
हे पुरस्कार राज्यातील साखर कारखान्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये सर्वोत्कृष्ठ काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले जातात. त्यामध्ये कार्यकारी संचालक, चिफ इंजिनिअर, चिफ केमिस्ट, शेतकी अधिकारी, फायनान्स मॅनेजर, आसवणी व्यवस्थापक, पर्यावरण अधिकारी यांना पुरस्कार देण्यात येतो.
त्याचबरोबर विभागवार तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार, कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार, कर्मयोगी शंकररावजी पाटील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, कै. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार, कै. विलासरावजी देशमुख MOST INNOVATIVE FACTORY AWARD, कै. वसंतदादा पाटील BEST OVERALL PERFORMANCE FACTORY AWARD असे विविध पुरस्कार दिले जातात. कै. वसंतदादा पाटील BEST OVERALL PERFORMANCE FACTORY AWARD चे स्वरूप रोख रू. २,५१,०००/- (दोन लाख एक्कावण्ण हजार रूपये), मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे.
सन २०२३-२४ वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट ऊस उत्पादन घेतल्याबद्दल एकूण २६ शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्कृष्ट कामगिरी बद्दल एकूण १३ सहकारी व ७ खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांना वैयक्तिक एकूण ७ बक्षिसे तसेच संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांना ५ वैयक्तिक बक्षिसे त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बदल देण्यात येणार आहेत.
पुरस्कारप्राप्त विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा…