महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे एक मोठा अपघाताची घटना घडली आहे. इथे रेल्वेच्या रुळावर प्रवासी मजुरांना मालगाडीने उडवले. औरंगाबाद येथील जालना रेल्वे लाइन जवळ ही दुर्घटना घडली. यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला, तसेच इतर मजूर जखमी आहेत. ही दुर्घटना औरंगाबाद- जालना रेल्वे लाइन वर शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान झाली. रेल्वे मंत्र्यांनी या घटनेच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.
हे सर्व प्रवासी मजूर पायी आपल्या घरी चालले होते, यादरम्यान ही घटना झाली. दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोचले.
हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील रहिवासी होते, मुख्यमंत्री शिवराज सिंह चोहान यांनी मृत मजुरांच्या कुटुंबाला 5-5 लाख देण्याजी घोषणा केली आहे. तंनी रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करुन जखमींना सहकार्य करण्यास सांगितले आहे.
दक्षिण सेंट्रल रेल्वे चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर यांनी सांगितले की, औरंगाबाद मध्ये कर्माड जवळ एक दुर्घटना घडली, जिथे मालगाडी चा एक रिकामा डबा काही लोकांवर चढला. आरपीएफ आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.
भारतीय रेल्वे कडून या दुर्घटनेबाबत सांगितले आहे की, औरंगाबाद येथून अनेक मजूर पायी प्रवास करुन येत होते. काही किलोमीटर चालल्यानंतर हे लोग रुळावर आराम करण्यासाठी थांबले, त्याच वेळी मालगाडी आली आणि अनेक मजूर गाडीखाली आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील औरंगाबाद मध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. पीएम मोदी यांनी ट्वीट करुन सांगितले की, औरंगाबाद मध्ये झालेेल्या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्याबद्दल मीही दु:खी आहे. पीएम मोदी यांनी या घटनेबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीची तपासणी करण्याबाबत सांगितले आहे.
कोेरोना मुळे लागू झालल्या लॉकडाउनमुळे देशभरात मजूर अडकले आहेत. कित्येक ठिकाणाहून हजारोंच्या संख्येने मजूर पायी प्रवास करुन आपल्या गावाला जात होते. अशामध्ये रात्री थांबण्यासाठी शेकडो मजूरांनी रेल्वे ट्रॅक चा आधार घेतला.
काही दिवस सरकारकडून मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी मिळाली होती. ज्यानंतर राज्य सरकारने बस ची व्यवस्था करुन आपल्या मजुरांना बोलावले. याशिवाय रेल्वेकडूनही विशेष कष्टकरी ट्रेनही चालवण्यात आली, जी मजुरांना त्यांच्या राज्यात पोचवत आहे.
पहिल्यांदा लॉकडाउन घोषित झाल्यानंतर लाखो मजूर जिथे होते, तिथे अडकले होते. राहण्याची, खाण्याची, रोजगारीच्या चिंतेत मजूर पायीच आपापल्या गावांकडे चालले होते. यापूर्वीही रस्त्यात झालेल्या काही अपघातांमध्ये प्रवासी मजूरांनी केल्या काही दिवसात आपला जिव गमावला आहे.
देशातील विविध भागामध्ये आता राज्य सरकारच्या शिफरशीवरुन विशेष श्रमिक ट्रेन सुरु केली आहे. या दरम्यान राज्य सरकारकडून जी लिस्ट दिली जात आहे त्यांनाच ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा