महाराष्ट्र : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजपचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्र सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबच उदासिन आहे. याबाबत भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सरकारकडून शोषण सुरू आहे. त्याविरोधात भाजप राज्यव्यापी आंदोलन करेल. साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, निकषानुसार, साखर कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, कारखाने या निकषाचे उल्लंघन करीत आहेत. काही कारखाने अंशतः पैसे देत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. पाटील म्हणाले, जेव्हा भाजप सत्तेवर होता, तेव्हा आम्ही साखर कारखान्यांना २१०० कोटी रुपये कर्जरुपात मदत केली होती. हे कर्ज व्याजमुक्त होतो. त्यातून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना विनाविलंब शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास मदत मिळाली होती.

पाटील म्हणाले, जर ऊस बिले मिळण्यात उशीर झाला तर शेतकरी पर्यायी पिकांकडे वळतील. त्यामुळे साखर उद्योग आणि इथेनॉल उत्पादनाचे नुकसान होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here