पुणे : महाराष्ट्रातील साखर हंगाम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. राज्यात आतापर्यंत, १३ मे २०२१ अखेर १८४ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर फक्त ६ कारखान्यांच्यावतीने गाळप सुरू आहे.
साखर आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार आतापर्यंत कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नांदेड, अमरावती आणि नागपूर विभागातील साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. आता फक्त अहमदनगर आणि औरंगाबाद विभागातील कारखाने सुरू आहेत.
अहमदनगर विभागातील २६ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. यापैकी २४ कारखाने बंद झाले आहेत. तर औंरंगाबाद विभागातील २२ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यापैकी १८ कारखाने बंद झाले आहेत.
जर राज्याचा विचार केला तर १०११.५३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले. १०६१.४२ लाख क्विंटल उत्पादन करण्यात आले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे.