छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. २१ मार्च रोजी अखेरचे दोन कारखाने बंज झाले. ऊस गाळप हंगामात मराठवाड्याची छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व खानदेशातील नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये १३ सहकारी साखर कारखान्यांनी ३४,५८,३२७ टन उसाचे गाळप केले. या कारखान्यांनी सरासरी ७.८३ टक्के साखर उताऱ्याने २७,०८,५१५ साखरेचे उत्पादन केले. ९ खासगी कारखान्यांनी ४५,७३,३१३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.१४ टक्के साखर उताऱ्याने ३७,२२,५९९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
या विभागात गतवर्षाच्या ऊस गाळपाच्या तुलनेत यंदा सुमारे १८ लाख ६१ हजार टन उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही सुमारे २४ लाख ३० हजार क्विंटलची घट नोंदविली गेली आहे. साधारणतः तीन ते साडेतीन महिने यंदा ऊस गाळप हंगाम चालला. गेल्यावर्षी २३ कारखान्यांनी सुमारे ९८ लाख ९२ हजार ६२३ टन उसाचे गाळप करत सरासरी सुमारे ८.९६ टक्के साखर कारखान्यांनी ८८ लाख ६१ हजार ४४६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. यंदा मात्र ८०,३१,३१,५४० टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला. या उसाच्या गाळपातून सरासरी ८.०१ टक्के साखर उताऱ्याने केवळ ३४,३१,१०५ टन साखरेचे उत्पादन झाले आहे.