पुणे : राज्यात यंदाच्या हंगामात 20 मार्च 2025 अखेर गाळपात हंगामात सहभाग घेतलेल्या 200 साखर कारखान्यांपैकी 173 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे. राज्यात आतापर्यंत साखर कारखान्यांनी 838.41 लाख टन उसाचे गाळप करून 792.59 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 9.45 टक्के इतका आहे. कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व कारखाने बंद झाले आहेत.
कोल्हापूर विभागातील 40 कारखान्यांनी 202.21 लाख टन उसाचे गाळप केले असून, 224.09 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. कोल्हापूर विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 11.08 टक्के इतका आहे. पुणे विभागातील 31 पैकी 24 कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे. विभागात 199.24 लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन 191.26 लाख क्विंटल झाले आहे. साखर उतारा सरासरी 9.6 टक्के आहे.सोलापूर विभागातही सर्व 45 कारखाने बंद झाले आहेत. कारखान्यांनी आतापर्यंत 130.36 लाख टन उसाचे गाळप करून 105.7 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 8.11टक्के आहे.
अहिल्यानगर विभागात 26 पैकी 20 कारखाने बंद झाले आहेत. विभागातील कारखान्यांनी 8.88 टक्के साखर उताऱ्याने 112.97 लाख टन उसाचे गाळप करून 100.31 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 22 पैकी 19 कारखाने बंद झाले आहेत. कारखान्यांनी 8 टक्के साखर उताऱ्याने 80.32 लाख टन उसाचे गाळप करून 64.29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
नांदेड विभागातील 29 पैकी 24 कारखाने बंद झाले असून त्यांनी 98.49 लाख टन उसाचे गाळप करून 95.1 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा साखर उतारा 9.66 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 4 पैकी 1 कारखाना बंद झाला आहे. 11.27 लाख टन उसाचे गाळप करून 10.03 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा उतारा 8.9 टक्के इतका आहे. नागपूर विभागात 3 कारखान्यांनी 3.55 लाख टन उसाचे गाळप करून 1.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नागपूर विभागाचा राज्यात सर्वात कमी 5.1 टक्के इतका उतारा आहे.