महाराष्ट्र : मान्सूनला विलंब पाउस पेरणी पद्धतीचे भयानक रुप, अनेक पीकांवर परिणाम

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मान्सूनला उशिर झाल्यामुळे महाराष्ट्रातील पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत 97 टक्के खाली आली आहे, असे मत कृषी राज्य विभागाने आपल्या रिपोर्टमध्ये व्यक्त केले आहे. उस, तेलबिया, कडधान्ये आणि कापूस ही पिके बुडाली आहेत. पेरणी करण्यासाठी शेतकरीही पावसाची वाट पहात आहेत.

सांगली हा असा एक जिल्हा आहे जिथे काही प्रमाणात पाउस झाला, दक्षिण महाराष्ट्र, मराठावाडा आणि विदर्भ या ठिकाणी अजूनही अपेक्षित पाउस नाही. जवळपास 21 जिल्ह्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षाही कमी पाउस झाला आहे. तर 11 जिल्ह्यात 25 ते 50 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जून 18 पर्यंत, एकूण शेतजमिनीपैकी फक्त 39 हजार 176 हेक्टर क्षेत्रातच
पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी 22 जूनपर्यंत 12.4 लाख हेक्टर क्षेत्रातील पेरणी पूर्ण झाली होती. जर पश्चिरम आणि दक्षिण महाराष्ट्रात उसक्षेत्रात पाउस जोरात झाला तर यावर्षी शेतकरी अडसाळी उसाची पेरणी करतील. कापूस पेरणीही फसलेली आहे. गेल्या वर्षी कापूस पेरणी 6.26 झाली होंती, त्या तुलनेत यंदा 19,430 हेक्टर झाली आहे. मान्सूनला उशिर झाल्याचा परिणाम तेलबिया आणि कडधान्य पिकांवर झाला आहे.

गेल्या वर्षी 3.33 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावर्षी, 137 हेक्टर क्षेत्रातच तेलबियांची पेरणी झाली आहे. खरीफ पिकाच्या पेरणीबाबत अजूनतरी सरकारचा रिपोर्ट आलेला नसला तरी, गेल्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 1.42 लाख हेक्टर क्षेत्रात खरीफ पिकांची पेरणी झाली होती. विलंबानंतर प्रारंभी केरळमध्येही मान्सूनने थोडी प्रगती केली असली तरी,
मान्सनूने संपूर्ण महाराष्ट्राला कव्हर केले आहे. पण तरीही अनेक राज्यांमध्ये पावसाची गैरहजेरीच राहिली. तथापि, पेरणी पद्धतीत वाढ होण्याची आपेक्षा आहे. पुढच्या काही आठवड्यात मान्सूनची तिव्रता वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here