महाराष्ट्र: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इथेनॉल प्लांटचे उद्घाटन

अहमदनगर : महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मंत्री शंकरराव गडाख-पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथील मुळा सहकारी साखर कारखाना लिमिडेटमध्ये (एमएसएसकेएल) इथेनॉल आणि डिस्टिलरी योजनेचे उद्घाटन केले.

या उद्घाटन समारंभानंतर त्वरीत आदित्य ठाकरे यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, मंत्री शंकरराव गडाख यांच्या मुळा उद्योग समुहामध्ये संस्थापक माननीय यशवंतराव गडाख यांच्यासोबत नगरमध्ये मुळा सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल आणि डिस्टिलरी योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रती दिन ५००० टीसीडी आहे. आणि १७,००० हून अधिक ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याशी संलग्न आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८७ गावे येतात. आयसीआरएच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष २०२० मध्ये कारखान्याने २६४.५१ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here