पुणे : राज्यातील ऊस लागवड क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी विशेष अभ्यास गटाकडून अभ्यास चालू आहे. आगाी दोन महिन्यांत या गटाचा अहवाल सादर होणार आहे. राज्याच्या ऊस शेतीला फर्टिगेशन व ऑटोमेशन या दोन्ही तंत्राची गरज आहे. सध्याची ऊसशेती १०० टक्के खाली कशी आणता येईल, याच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कृतिगट स्थापन केला होता. यातून सूक्ष्म सिंचन तंत्राचा विस्तार, उपसा जलसिंचन योजना सौरऊर्जेवर चालविणे या मुद्यांवर धोरणात्मक निर्णय होतील, अशी माहिती माजी साखर आयुक्त व ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी दिली. ‘नेटाफिम ने आयोजित केलेल्या फर्टिगेशन व ऑटोमेशन तंत्रांद्वारे ‘एकात्मिक ऊस व्यवस्थापन’ या विषयावरील परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कृष्णा पाटील डोणगावकर होते.
यावेळी विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, नेटाफिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास सोनवणे व मध्य व उत्तर भारत प्रमुख कृष्णात महामूलकर, कावेरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रवीण राव, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिाता डॉ. रवींद्र बनसोड, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, व्हीएसआयच्या कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ पी. पी. शिंदे आदी उपस्थित होते. विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, डॉ. राजेंद्र भिलारे, फलोत्पादन संचालक डॉ. मोते आदींनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्याने एकरी केवळ ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली तरी उसाचे उत्पादन वाढून साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न वाढते असे ‘नेटाफिम’चे सीईओ सोनवणे यांनी सांगितले.