पुणे : महाराष्ट्रातील साखर उद्योगासमोर पावसाने मोठे आव्हान उभे केले आहे. राज्यातील ऊस गळीत हंगाम अधिकृतरित्या १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्याच्या सहकार विभागाने सांगितले की, पावसामुळे गळीत हंगामाच्या प्रक्रियेस किमान एक महिन्याचा उशीर होईल. शेतांमध्ये अद्याप पाणी भरले आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत साखर कारखाने सुरू होतील अशी शक्यता आहे.
सद्यस्थितीत राज्यभरातील प्रतिकूल हवामानामुळे एकूण २०३ साखर कारखान्यांपैकी फक्त ३२ कारखान्यांनी ऊसाचे गाळप सुरू केले आहे. पावसामुळे अनेक विभागांतील शेतांमध्ये पाणी साठले आहे. आणि ऊसाची तोडणी करण्यास उशीर होत असल्याने तोडणी कामगारांना शेजारील गावांचा आश्रय घ्यावा लागत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की, १५ ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू केला जाईल. हंगामासाठी औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतरही शेतांमध्ये पाणी असल्याने प्रत्यक्ष कामास उशीर झाला आहे.