महाराष्ट्र : गळीत हंगाम २१ नोव्हेंबरनंतर सुरू करण्याची आ. सदाभाऊ खोत यांची मागणी

सांगली : रयत क्रांती संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी गळीत हंगाम २१ नोव्हेंबरनंतर सुरू करा, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला आहे. साखर कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरला चालू केल्यास ऊस तोडणी कामगार आणि संबंधित इतर लोक हे मतदानापासून वंचित राहतील असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे.

याबाबत आमदार खोत यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्याच्या निर्णयानुसार, २०२४-२५ चा गळीत हंगामाला १५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या राज्यभरात गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या बाबींचा गांभीर्याने विचार करून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, याकरिता या वर्षीचा गळीत हंगाम २१ नोव्हेंबर नंतर सुरू करणेबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here