पुणे : ऊसतोडणी मजूर व मुकादम, वाहतूक कंत्राटदार यांच्याकडून ऊस तोडणीकरिता पैशांची मागणी होत असल्यास कारवाई करण्याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने ८ डिसेंबर २०२३ रोजी पत्र दिले आहे. त्यानुसार साखर कारखान्याने याबाबतच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती करून संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावयाचा आहे. कारखान्यांकडून तक्रारींचे निराकरण न झाल्यास प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांच्या कार्यालयास विहित नमुन्यात rjdsugarpune@gmail.com या संकेतस्थळावर तक्रार करण्याच्या सूचना सहकारी संस्थेचे (साखर) विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांनी केले आहे.
अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, राज्यातील साखर कारखान्यांकडून होत असलेल्या वजन काट्यांचा वापर व दक्षता, तसेच साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीसंदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत १८ ऑक्टोबर २०२२, ९ नोव्हेंबर २०२२ व २५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या होत्या.सहकारी, खासगी साखर कारखाने यांना ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रेलर, बैलगाडी यांना रिफ्लेक्टर बोर्ड व रिफ्लेक्टर टेप लावण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार या परिपत्रकांची प्रत विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था (साखर) यांचे कार्यालय सदरबझार सातारा यांच्या कार्यालयात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.