महाराष्ट्र : २३ महिन्यांमध्ये पहिल्यांदाच कोरोना बळी नाही, नवे ५४४ रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाची लाट आता थांबली आहे. दररोज रुग्णांचे आकडे कमी होत आहेत. नागरिकांसाठी हा दिलासा आहे. तर गेल्या २४ तासात कोविडमुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. १ एप्रिल २०२० नंतर पहिल्यांदाच अशी चांगली स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची नव्या रुग्णसंख्याही झपाट्याने कमी होत आहे. राज्यात गेल्या २४ तासात ५४४ नवे रुग्ण आढळले. एकूण ७८.६६ लाख रुग्णसंख्या झाली आहे. दैनिक रुग्णसंख्या ७३ आणि ७७ वरुन १०० झाली आहे. मात्र, १०० पैकी फक्त १३ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

जून २०२० मध्ये राज्यात १०४९ जणांचा मृत्यू झाला होता. ही मृत्यू संख्या पहिल्या लाटेत होती. तर २८ एप्रिल २०२१ रोजी दुसऱ्या लाटेत ९८५ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांत मृतांची संख्या दोन ते आठ अशीच होती. तर तिसऱ्या लाटेत २८ जानेवारीला मृतांची संख्या १०३ झाली होती. दरम्यान, राज्यात ओम्रीकॉनचे नवे ३८ रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी १०४ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत ही रुग्णसंख्या कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here