महाराष्ट्र : शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरअखेरपर्यंत ८ हजार ५४ कोटी रुपये एफआरपी अदा

पुणे : राज्यात ३१ डिसेंबर २०२३ अखेर एकूण १९७ साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू करण्यात आले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ३०३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्यांनी ८५.७१ टक्के एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. राज्यात ४१ लाख ८६ हजार टन साखर उत्पादन झाल्याचे साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात नमूद केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय ९ हजार ३९७ कोटी रुपये एफआरपीपैकी ३१ डिसेंबर २०२३ अखेर ऊस तोडणी वाहतूक खर्चासह ८ हजार ५४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

राज्यात १९७ कारखान्यांनी ४ जानेवारी २०२४ अखेर ४६३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. ९.०४ टक्के सरासरी उताऱ्यानुसार ४१ लाख ८६ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. सध्या रोज ९ लाख १७ हजार ३५० टन क्षमतेने उसाचे गाळप सुरू आहे. शेतकऱ्यांना एफआरपीचे १,३४३ कोटी रुपये अद्याप मिळायचे आहेत. ८९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के एफआरपी दिली आहे. तर २२ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के पैसे दिले आहेत. ५० कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के रक्कम आणि ३६ कारखान्यांनी शून्य ते ५९ टक्के एफआरपी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here