महाराष्ट्राला इथेनॉल उत्पादनातून मिळाले ४७०० कोटी रुपये

पुणे : राज्यात २०२२-२३ च्या हंगामात ८२ इथेनॉल प्रकल्पांतून पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल ७६ कोटी ५४ लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला. त्यातून इथेनॉल प्रकल्पांना ४७०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील कारखान्यांनी सुमारे १३५ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याच्या निविदा भरल्या आहेत. त्यातून या सर्व प्रकल्पांना सुमारे ८५०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या सी हेवी इथेनॉल – ४९.४१ रुपये, बी हेवी इथेनॉल – ६०.७३ रुपये तर ज्यूसपासून उत्पादित इथेनॉलला प्रति लिटर ६५.६१ रुपये दर मिळत आहे.

राज्यात एकूण १२२ इथेनॉल प्रकल्प असून त्यांची २२६ कोटी लिटर इतकी इथेनॉल उत्पादन क्षमता आहे. मात्र अद्याप राज्यात पूर्ण क्षमतेने इथेनॉल उत्पादन होऊ शकलेले नाही. मळी, ज्यूस आणि सिरप यांचा अपुरा पुरवठा राज्याच्या इथेनॉल उत्पादनाला मर्यादा आणत आहे. साखर आयुक्तालयातील आकडेवारीनुसार, राज्यातील ३४ सहकारी साखर कारखान्यांनी २४.६२ कोटी लिटर, ३९ खासगी कारखान्यांनी ४७.५९ कोटी लिटर आणि केवळ इथेनॉल उत्पादन करणाऱ्या (स्टैंड अलोन डिस्टलरी) 9 प्रकल्पातून ४.४३ कोटी लिटर असा एकूण ७६.५४ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा जून २०२३ अखेर पेट्रोलियम कंपन्यांना करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here