मुंबई : साखर उद्योगाला मोठा दिलासा देताना महाराष्ट्र सरकारने मंगळवारी, १ मे नंतरच्या अतिरिक्त उसाच्या गाळपासाठी २०० रुपये प्रती टन अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा केली आहे. जवळपास १८ जिल्ह्यांमध्ये अद्याप १९.५२ लाख टन ऊस गाळपाविना असल्यामुळे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्ध्वव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अद्याप काही सहकारी आणि खासगी साखर कारखाने शेतांमध्ये उभ्या असलेल्या ऊसाचे गाळप करण्याचे काम करीत आहेत.
या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाने जाहीर झालेले हे अनुदान अलिकडेच ऊसाच्या वाहतुकीसाठी जाहीर झालेले अनुदान आणइ साखरेच्या उताऱ्यासाठी देण्यात आलेल्या अनुदानापेक्षा अतिरिक्त आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१-२२ या चालू गळीत हंगामात जोपर्यंत संपूर्ण उसाचे गाळप केले जात नाही, तोपर्यंत कारखाने सुरू राहतील अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.